सावित्रीच्या लेकी

Empowering communities through skill development and sustainable employment

Social activity

सावित्रीच्या लेकी

सावित्रीच्या लेकी
Event Date

January 3, 2025

About This Event

शुक्रवार दिनांक 3 जानेवारी 2025 रोजी शंकरराव मोरे विद्यालय व लोकनेते सुबराव कदम ज्युनिअर कॉलेज, एरंडवणे येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या निमित्ताने 'सावित्रीच्या लेकी 'हा सन्मान सोहळा मोठया उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी भारती विद्यापीठ लॉ कॉलेज च्या प्राचार्या डॉ. उज्वला भेंडाळे होत्या तर स्वागताध्यक्ष शंकर राव मोरे विद्यालय व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य श्री अनिल कापसे होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले त्याचबरोबर भारती विद्यापीठाचे संस्थापक डॉ. पतंगराव कदम यांच्या प्रतिमेस पुष्पान्जली अर्पण करण्यात आली. स्वागत गीतानंतर मा. प्राचार्य श्री अनिल कापसे सर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.

Interested in Similar Events?

Stay updated with our upcoming programs and events.

View All Events Contact Us