Some Natural therapies arranged for poor and needy people fr

Empowering communities through skill development and sustainable employment

Social activity

Some Natural therapies arranged for poor and needy people fr

Some Natural therapies arranged for poor and needy people fr
Event Date

June 23, 2025

About This Event

पुणे, ता. २३: जय अंबा माता
स्वयंरोजगार संस्थेच्या माध्यमातून दरवर्षीप्रमाणे यावर्षीही वेगळा उपक्रम राबविण्यात आला, पालखी सोहळ्यामध्ये सहभागी झालेल्या थकलेल्या वारकऱ्यांचे संस्थेच्या पदाधिकारी महिलांनी प्रथम त्यांचे पाद्यपूजन करून त्यांना कास्यथाळीद्वारे मसाज देण्यात आला. तसेच वारीच्या दरम्यान होणाऱ्या शारीरिक थकव्यावर आराम मिळावा आणि वारकऱ्यांनी निर्धास्तपणे आनंदाने पुढील प्रवास पूर्ण करावा यासाठी विशेष औषधी मलमचे वाटप करण्यात आले.
याशिवाय वारकऱ्यांना दोन-तीन दिवस टिकतील असे खाद्यपदार्थांचे वाटप करण्यात आले. संस्थेच्या पदाधिकारी मंगलताई नागुल, स्वप्ना वारुळे, नम्रता नागुल, रूपाली मांजरे, मनीषा शिळीमकर, स्नेहल भिकुले, रसिका नागुल, सुचेता नागुल, संगीता क्षीरसागर वारकऱ्यांसाठी सेवेचे नियोजन केले.

Interested in Similar Events?

Stay updated with our upcoming programs and events.

View All Events Contact Us