Empowering communities through skill development and sustainable employment
जय अंबामाता संस्थेतर्फे स्व-संरक्षणाचे धडे
धनकवडी : शुक्रवार पेठेतील पानगंटी चौकातील जय अंबामाता स्वयंरोजगार
संस्थेतर्फे मुलींसाठी स्व-संरक्षणाचे धडे देण्यात आले. संस्थेतर्फे नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये भजन, कीर्तन, लहान मुलांसाठी जादूचे प्रयोग, कठपुतली शो, अवंती पाटणकर यांचा भरतनाट्यम कार्यक्रमाचा समावेश होता. दृष्टिहीन बांधवांना आर्थिक मदत व्हावी, या उद्देशाने सूर-सरगम-स्वराली प्रस्तुत मराठी, हिंदी चित्रपट गीत, भावगीतांचा कार्यक्रम घेण्यात आला. सर्व वयोगटासाठी फॅन्सी ड्रेस व नृत्य स्पर्धा घेण्यात आल्या. गरबा, दांडिया, महाभोंडला पाककृती, उखाणे स्पर्धेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सध्या शहरात वाढती गुन्हेगारी, महिला-मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न भेडसावत असताना महिलांनी स्वसंरक्षण कसे करावे, याअनुषंगाने शुक्रवार पेठेतील कान्होजी आंग्रे शाळेत प्रशिक्षक अभिषेक देशमुख यांनी स्व-संरक्षणाची प्रात्यक्षिके सादर केली. या प्रसंगी डॉ. राजेंद्र भवाळकर, शाळेतील शिक्षिका, विद्यार्थी उपस्थित होत्या. नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक बक्षिसांचे वाटप करण्यात आले. सर्व उपक्रमांच्या यशस्वितेसाठी जय अंबामाता स्वयंरोजगार संस्थेच्या अध्यक्षा मंगल नागूल, यांच्यासह स्वप्ना वारुळे, नम्रता नागुल, स्नेहल भिकुले, रसिका नागुल, संगीता क्षीरसागर, संगीता भिलारे मनीषा शिळीमकर, रूपाली मांजरे सुचेता नागुल, राजश्री सोनटक्के आदींचे विशेष सहकार्य लाभले.
Stay updated with our upcoming programs and events.
View All Events Contact Us